पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या निर्णायामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा – आ.विखे पाटील

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- आंतरराष्ट्रीय पातळीवर खतांसाठी लागणाऱ्या रसायनांच्या किंमतीत वाढ झाली तरीही डीएपी खतांच्या वाढीव अनुदानासाठी १४,७७५ कोटी रुपयांचा बोजा सोसून शेतकऱ्यांना मागील वर्षीच्या जुन्याच भावाने रासायनिक खत उपलब्ध करून देण्याचा पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याची प्रतिक्रिया आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

आ.विखे पाटील यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारने रासायनिक खतांसाठी आणखी १४,७७५ कोटी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे डीएपी खतासाठीची सबसिडी १४० टक्के वाढली असून,

आता शेतकऱ्यांना डीएपी खताची गोणी मागील वर्षीच्याच म्हणजे १२०० रुपये भावाने उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने केंद्र सरकारचा निर्णय शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा ठरणार आहे.

केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले त्याच पध्दतीने आजचा निर्णयही स्वागतार्ह असल्याचे विखे पाटील म्हणाले.

आंतरराष्ट्रीय बाजारात रासायनिक खतासाठी लागणाऱ्या फॉस्फरिक अॅसिड, अमोनिया या रसायनांच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे खत कंपन्यांनी भारतात रासायनिक खताच्या किंमतीत वाढ केली.

परंतु, सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना या खताच्या किंमतीचा वाढीव बोजा झेपणारा नव्हता यासाठीच केंद्र सरकारने याबाबत घेतलेला निर्णय देशातील कृषी क्षेत्रासाठी महत्वपूर्ण असल्याचे विखे यांनी नमूद केले.

शेतकऱ्यां समोर सध्या कोव्हीड आणि नैसर्गिक आपतीच्या संकटाचे मोठे आव्हान उभे राहीले आहे.तरीही मागील वर्षभरात देशातील कृषी क्षेत्राने चमकदार कामगिरी केल्यामुळेच अर्थ व्यवस्थेला स्थिरता मिळल्याकडे लक्ष वेधून आ.विखे पाटील यांनी सांगितले.

कोव्‍हीडच्‍या या महासाथीच्या भयानक संकटात देशात अन्नधान्याची कमतरता भासली नाही यामागे शेतकऱ्यांचे कष्ट आहेत याची जाणीव ठेवून

आंतरराष्ट्रीय बाजारात रसायनांच्या किंमतीत वाढ झाली असली तरी अनुदानाचा वाढीव बोजा सहन करून शेतकऱ्यांना गेल्या वर्षीच्या भावातच खते उपलब्ध करण्याचा मोदी सरकारचा निर्णय महत्त्वाचा ठरला आहे.

या निर्णयामुळे केंद्र सरकारला १४,७७५ कोटींचा बोजा सोसावा लागणार असला तरी शेतकऱ्यांसाठी डीएपी खतासाठीची भाववाढ कमी झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा असल्याचे आ.विखे यांनी सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24