डॉनला जबरदस्त झटका! दाऊद गँगचा फायनान्सरचे कारागृहात निधन

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 10 सप्टेंबर 2021 :- मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर आणि डी गॅंगचा फायनान्सर युसूफ लकडावालाचा ऑर्थर रोड कारागृहात मृत्यू झाला आहे. पोलिसांनी लकडावलाला जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. युसूफ लकडावाला कर्करोगाने ग्रस्त होते आणि ६ सप्टेंबर रोजी त्यांना तुरुंगाच्या रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले होते. याबाबत माहिती देताना कारागृह अधिकाऱ्यांनी सांगितले की, कर्करोगाने ७६ वर्षीय युसूफ लकडावाला आजारी होते.

बुधवारी सकाळी त्यांना जेजे रुग्णालयात हलवण्यात आले होते. आज (गुरुवार) रुग्णालयाने युसूफ लकडावाला यांच्या मृत्यूची माहिती दिल्याचे वृत्त एका वेबसाईटने दिले आहे.

दरम्यान 2019 मध्ये जमीन खरेदीप्रकरणी सरकारी कागदपत्रामध्ये फेरफार करत पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली बिल्डर युसूफ लकडावालाला (76) अहमदबाद आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती.

गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरून लंडनमध्ये पळून जाण्याच्या तयारी असलेल्या लकडावालाला अटक करण्यात झाली होती.

Ahmednagarlive24 Office