क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिवादन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- थोर समाज सुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, अल्पसंख्यांक काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख,

विशेष निमंत्रित तथा विद्यार्थी काँग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला आदींनी माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पक्षाच्या वतीने अभिवादन केले.

कोरोनामुळे प्रशासनाच्या वतीने निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या नियमांचे पालन करीत अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना मनोज गुंदेचा म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजातील रूढी, परंपरा यांना छेद देत समाजामध्ये बदल रुजवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांना मोठा संघर्षला तोंड द्यावे लागले.

खलील सय्यद म्हणाले की, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये महात्मा फुले यांनी केलेले क्रांतिकारी कामामुळे समाजाची दिशा बदलून गेली. अनंतराव गारदे म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले यांना सावित्रीबाईंची मिळालेली साथ अत्यंत महत्त्वपूर्ण होती.

अनिस चुडीवाला म्हणाले की, केवळ शिक्षण क्षेत्रातच नाही तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देखील महात्मा फुले यांनी केलेले काम हे वाखाणण्याजोगे आहे.

अज्जू शेख म्हणाले की, महात्मा फुले हे समाजसुधारक, लेखक, विचारवंत होतेच पण ते यशस्वी कंत्राटदार देखील होते. आपल्या अतुलनीय कार्यातून त्यांनी आपली ओळख समाजात निर्माण केली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24