अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- अथक पर्यटनानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यानंतर जिल्ह्यात अनेक स्थानिक नेते असतानाही त्यांना डावलून नगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी हसन मुश्रीफ यांची वर्णी लागली.
मात्र आता नगरकरांना दुर्लभ दर्शन झालेल्या पालकमंत्र्यांच्या कामगिरीबाबत स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. आता हि नाराजी पालकमंत्र्यांना अडचणीची ठरू शकते अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.
कोल्हापूरमध्ये बसून नगर जिल्ह्याचे पालकतत्व स्वीकारलेल्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या जिल्ह्यातील कामगिरीबद्दल पक्षाच्या नेतृत्वापासून जिल्ह्यातील स्थानिक नेत्यामध्ये नाराजीचा सूर आहे.
मुश्रीफ यांच्याविरोधातील तक्रारी थेट राष्ट्रवाीदचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापर्यंत पोहचल्या असून यामुळे मुश्रीफ यांचे नगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद धोक्यात आले आहे. यामुळे मुश्रीफ यांच्याकडून नगरचे पालकमंत्रीपद हे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर नगरपासून कोसो दूर असणार्या कोल्हापूरचे मुश्रीफ यांच्या खांद्यावर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आली.
पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर नगरला पहिल्याच बैठकीत मुश्रीफ यांनी जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत करून नगर शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याचा मानस बोलून दाखविला.
मात्र, त्यानंततर पालकमंत्री गायबच झाले. दरम्यान, करोनाचा कहर वाढला. या काळात पालकमंत्री मुश्रीफ यांची जिल्ह्याला नितांत गरज असतांना महिनामहिना ते गायब होते. यामुळे करोना हातळण्याची जबाबदारी अधिकार्यांना पार पाडावी लागली.
जिल्ह्यात कोरोनाने कहर केला मात्र पालकमंत्री गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत व्यस्त होते. एकंदरीत जिल्ह्यातील सर्वच परिस्थिती हाताळण्यात पालकमंत्री मुश्रीफ कमी पडल्याचे दिसत आहे.
वाढता करोना करोनाचा धोका हाताळण्यासाठी अखेर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना जिल्ह्यात फिरण्याची वेळ आली.
आता हीच गोष्ट थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या दरबारात गेली आहे. यामुळे लवकरच मुश्रीफ यांची पालकमंत्री पदावरून उचलबांगडीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे नगरच्या पालकमंत्री पदासाठी आपसूक गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.