अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :- ऐक्याची स्नेहाची आणि नववर्षांच्या स्वागताची गुढी उभारताना कोव्हीड संकट निवारण्याचा संकल्प करून खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी कोव्हीड सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या रूग्णासमवेत पाडवा सण गोड केला.
गुढी पाडव्याचे औचित्य साधून खा.सुजय विखे पाटील यांनी शिर्डी येथील कोव्हीड रूग्णालयास भेट दिली.सर्व नियमांचे पालन करून त्यांनी कोव्हीड सेंटर मध्ये आरोग्याची गुढी उभारली.
या संकटला घालविण्यासाठी उपाय योजनांबरोबरच नियमांचे पालन आणि निर्बधांची अंमलबजावणी करण्याचा संकल्प यानिमित्ताने सर्व अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी केला.
शिर्डी विभागाचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रमोद म्हस्के वैद्यकीय अधिकारी मैथिली पितांबरे डॉ.गोकुळ घोगरे डाॅ संजय गायकवाड मंगेश त्रिभुवन सुजित गोंदकर यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या मनावर या संकटाची भीती कायम आहे.पारंपरिक सण असूनही कुटूंबियां समवेत साजरा करता येवू शकत नाही.
या दुखाचा ओलावा या रुग्णांना जाणवू नये म्हणूनच खा.विखे यांच्यासह अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी सर्व नियमांचे पालन करून काही काळ रुग्णालयात घालून त्यांना दिलासा दिलाच आणि जेवण वाढून पाडवा सणाचा आनंदही मिळवून दिला.
कोव्हीड रुग्णांची वाढत असलेली संख्या लक्षात घेवून कोव्हीड सेंटर मध्ये अधिकच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी आ.विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून सूचना दिल्या होत्या.त्याचाच पाठपुरावा खा.विखे यांनी रुग्णालयास भेट देवून केला.
बेडची व्यवस्था आॅक्सिजन सुविधा आणि आवश्यक असणारी उपचाराची साधन उपलब्ध करण्याच्या दृष्टीने खा.विखे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून सहकार्य करण्याची ग्वाही दिली.