गुणरत्न सदावर्ते एस.टी कर्मचाऱ्यांना भडकवत आहेत; शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर कर्मचाऱ्यांची टीका

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :- अनेक दिवसापासून सुरू असलेल्या एस.टी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी आज सह्याद्री अतिथी गृहावर बैठक पार पडली.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यावेळी खासदार शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत प्रदिर्घ चर्चा करून एस.टी संघटनांच्या प्रतिनिधींनी आपले मुद्दे मांडले.

या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन एसटी संघटनांच्या प्रतिनिधींनी अ‍ॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यावर चांगलीच आगपाखड केली आहे.

Advertisement

गुणरत्न सदावर्ते कामगारांना चुकीच्या पद्धतीने भडकावत आहेत. आम्ही शरद पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा केली.

यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीतील त्रुटी दूर करण्याचे आश्वासन दिले. तसेच अजूनही कामावर रुजू न झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्याही वाचणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी आपला रोजीरोटी वाचवली पाहिजे. एसटी टिकली तरच त्यांचा रोजगार टिकणार आहे असं पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

Advertisement

तसेच गुणरत्न सदावर्ते यांना हटवून आता त्यांच्याऐवजी दुसरे वकील एसटी कर्मचाऱ्यांची बाजू न्यायालयात मांडणार आहेत. वकील सतीश पेंडसे यांच्याकडे आता युक्तिवाद करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

आपली बांधिलकी ही प्रवाशांशी आहे, ही बाब एसटी कर्मचाऱ्यांनी ध्यानात ठेवावी. राज्य सरकार तुमच्या मागण्यांविषयी सकारात्मक आहे.

मागण्या करण्यात काहीही गैर नाही. पण मागण्या मांडताना कुठपर्यंत जावं, याचं तारतम्य बाळगणे गरजेचे आहे. एसटी कृती समितीतील संघटनांनी हे तारतम्य बाळगत संप मागे घेण्याची हाक दिली आहे.

Advertisement

परिवहनमंत्र्यांनीही मागणयांविषयी सकारात्मक भूमिका दाखवली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी या सगळ्याचा गांभीर्याने विचार करत संप मागे घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांनी केले आहे.