अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- एका तरुणावर किरकोळ वादाच्या कारणावरुन कोयत्याने खुनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपुरात शहरात घडली आहे. यामुळे नगर जिल्ह्यात गुंडाराज जशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असेच वाटू लागले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 2, नवी दिल्ली परिसरात राहणारा इम्रान उर्फ मुल्ला युसूफ कुरेशी याच्याबरोबर साहिल अन्वर शेख व मनोज संजय साबळे या दोघांनी काहीतरी वाद काढून इम्रान यास शिवीगाळ करुन साहिल शेख व मनोज साबळे या दोघांनी त्याच्या मानेवर व डोळ्यावर कोयत्याने वार केले.
यात इम्रान हा गंभीर जखमी झाला असून त्यास उपचारासाठी काल रात्री लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तेथील डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती घेऊन यातील साहिल अन्वर शेख व मनोज संजय साबळे या दोघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.