गुरुजींचा दानशूरपणा ; गोरगरीब रुग्णांसाठी सुरु केले तीन कोरोना सेंटर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोना विषाणूने आपले पाय मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. यामुळे नागरिकांचे प्राण जाव लागले आहे.

अनेकांना वेळेत उपचार उपलब्ध होत नसल्याने त्यांच्यावर मरण ओढवत आहे. यातच या रुग्णांना काहीसा आधार देण्याचा प्रयत्न शिक्षकांनी केला आहे.

शिक्षकांनी गोरगरीब रुग्णांना वाचविण्यासाठी जिल्ह्यात तीन कोरोना सेंटर उभे केले आहेत. तर आणखी एक कोरोना सेंटर उभे करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्याशिवाय जिल्ह्यातील इतर कोरोना सेंटरसाठी लाखो रुपयांचा निधी शिक्षकांनी उभा केला आहे.

कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी गुरुजी उतरले मैदानात

अकोले : अकोले तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी मिळून स्वतः एक कोविड केअर सेंटर निर्माण केले असून त्यासाठी सुमारे १५ लाख रुपयांचा निधी उभारला आहे.

श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातील शिक्षकांनी येथील ग्रामीण रुग्णालय तसेच नगरपालिकेचे नागरी आरोग्य केंद्र यासाठी ऑक्सिजन मशीन घेण्यासाठी साडेतीन लाख रुपयांचा निधी ३ दिवसांत उभा केला आहे.

शेवगाव : शेवगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी सुमारे ५ लाख रुपयांपेक्षा जास्त निधी कोविड सेंटरसाठी स्वयंस्फूर्तीने जमा केला. नेवासा ल नेवासा तालुक्यातील शिक्षकांनी भेंडा येथे कोविड सेंटरसाठी ३० बेड तसेच इतर साहित्य उपलब्ध करून दिले.

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी सिंधू लॉन्स येथे एक तसेच चंदनापुरी येथे दोन कोविड सेंटर उभारले असून तेथे ऑक्सिजन बेडची सुविधा निर्माण केली आहे. यासाठी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी सुमारे १० लाख रुपयांचा निधी उभारला आहे.

कोपरगाव राहता : कोपरगाव व राहाता तालुक्यातील शिक्षकांनीही कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी उभारून आवश्यक सुविधा पुरविल्या आहेत.

राहुरी : राहुरी तालुक्यातील शिक्षकांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे मोठा निधी सुपुर्द केला. नगर तालुक्यातील शिक्षकांनीही लाखो रुपयांचा निधी उभा करून त्यातून आवश्यक साहित्य खरेदी केले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24