अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे गुटखा व मावा विक्री खुलेआम सुरू होती. नुकतेच राहुरी पोलिसांनी राहुरी फॅक्टरी परिसरात छापा टाकून सुमारे 9 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरी फॅक्टरी परिसरातील अमिर शेख याच्या खोलीमध्ये आरोपी पोपटलाल भंडारी (रा. राहुरी फॅक्टरी ता. राहुरी) यांच्याकडे सुगंधी सुपारी व मसाला विक्री करण्याच्या उद्देशाने आढळून आली.
पोलीस दिसताच तो पळून गेला. त्याच्या आजूबाजूला नाव-गाव विचारले असता त्याचे नाव पोपटलाल भंडारी असल्याचे समजले.
यावेळी त्या ठिकाणाहून हिरा पुडे व मावा बनविण्याची सुपारी व तंबाखू असा 6 हजार 210 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हवालदार सचिन ताजणे यांच्या फिर्यादीवरून पोपटलाल भंडारी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.