अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- श्रीरामपूर शहरात एका इसमाकडून पोलिसांनी 10 हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहरातील काजी बाबा रोडवर एका इसमाकडे गुटखा असल्याची माहिती पालिसांना मिळाली.
त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी छापा टाकला. याठिकाणी कादर नावाच्या इसमाकडून पोलिसांनी दहा हजार रुपयांचा गुटखा जप्त केला.
कादर याच्याकडुन पोलिसांनी जप्त केलेल्या गुटख्यामध्ये विमल आणि आर एमडी कंपनीचा गुटखा याचा समावेश आहे. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यभर शासने गुटखा बंदी केलेली असतांना श्रीरामपूर शहरात गुटख्याची सर्रास विक्री होत असल्याने या घटनेची देखील चांगलीच चर्चा होत आहे