अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यातील गुटख्याचे उख्य केंद्रबिंदू म्हणून ओळख निर्माण आलेल्या संगमनेर तालुक्यात पुन्हा एकदा गुटखा आढळून आला आहे. या अवैध गुटखा तस्करांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
पोलिसांकडून एवढ्या कारवाया करून देखील दोन दिवासाआड तालुक्यात गुटख्याची प्रकरणे घडत आहे. दरम्यान संगमनेर तालुक्यातील एका गावात गुटख्याची वाहतूक करताना आढळल्याने पोलिसांनी तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून 47 हजार 700 रुपयांचा गुटखा व साडेपाच लाख रुपये किंमतीची कार जप्त केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर तालुक्यात गुटख्याची खुलेआम विक्री सुरु आहे. तालुक्यातील सायखिंडी फाटा येथे बेकायदेशीरपणे गुटख्याची वाहतुक होत असल्याची माहिती शहर पोलिसांना समजल्याने पोलीस घटनास्थळी पोहचले. या ठिकाणी लोगन कंपनीची कार क्रमांक एम. एच. 04 ई. डी. 7283 आढळली.
पोलिसांनी चौकशी केली असता या कारमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचा गटखा दिसून आला. पोलिसांनी पंचनामा करुन 38 हजार 160 रुपये किंमतीचे विमल पान मसाल्याचे 318 पॅकेट, 9 हजार 540 रुपये किंमतीची रॉयल 717 तंबाखुचे 318 पॅकेट व साडेपाच लाख रुपये किंमतीची कार जप्त केली आहे.
याबाबत पोलीस शिपाई सचिन धनवटे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अफ्रोज रफिक शेख (वय 26), कैफ अन्वरखान पठान (वय 26) दोघेही रा. नायकवाडपुरा, रितेश सुभाषचद्र गादीया (रा. कोळपेवाडी, ता. कोपरगाव) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित महाजन हे करत आहे.