‘हा’ ठरला आयपीएल मधील सर्वाधिक महागडा खेळाडू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-दरवर्षीप्रमाणे यंदाही आयपीएलच्या लिलावात खेळाडूंसाठी कोटीच्या कोटी रक्कम मोजणं सुरू आहे.

यंदा आतापर्यंतच्या लिलावात ख्रिस मॉरीस, ग्लेन मॅक्सवेल आणि जाय रिचर्डसन सर्वात महागडे खेळाडू ठरले आहेत. ख्रिस मॉरीसला राजस्थान रॉयल्सने तब्बल 16 कोटी 25 लाख रुपयांना विकत घेतलं. त्यानंतर नंबर आहे ग्लेन मॅक्सवेलचा.

ग्लेननला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 14 कोटी 25 लाख रुपयांना घेतलं.तर जाय रिचर्डसनसाठी किंग्ज XI पंजाबने 14 कोटी रुपये मोजले आहेत.

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ख्रिस मॉरिस आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. मॉरिसनं भारताच्या युवराज सिंहचा विक्रम मोडीत काढला आहे.

युवराजला दिल्लीनं 16 कोटी रुपयांत खरेदी केलं होतं. 2021 च्या आयपीएल लिलावात ख्रिस मॉरिसला राजस्थान रॉयल्सनं 16 कोटी 25 लाख रुपयांची बोली लावत आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतलं आहे.

75 लाख रुपयांची मूळ किंमत असणाऱ्या ख्रिस मॉरिसला खरेदी करण्यासाठी संघमालकांमध्ये रस्सीखेच झाली ख्रिस मॉरिसची कारकीर्द मॉरिसने आतापर्यंत आयपीएलमध्ये 70 सामने खेळले आहेत.

त्यात त्याने 157.87 च्या स्ट्राईक रेटने 551 धावा केल्या आहेत. तसेच त्याला 80 विकेट घेण्यातही यश आले आहे. मॉरिस याआधी चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली, राजस्थान आणि आरसीबी या संघांकडून खेळला आहे.

मागील वर्षी आरसीबीने त्याला 10 कोटी रुपयांत खरेदी केले होते. या संघाकडून खेळताना त्याने 9 सामन्यांत 11 विकेट घेतल्या होत्या.

परंतु, आरसीबीने त्याला पुन्हा करारबद्ध केले नाही. आता तो राजस्थान संघाकडून खेळणार असून संजू सॅमसन यंदा या संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24