अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- बहिणीला भेटून परत घरी येताना एक काळीपिवळी गाडीचालकासोबत ओळख झाली. गप्पा मारताना तिचा मोबाइल नंबर घेतला पुढे अनेकवेळा फोनवर बोलणे होत असे .
मग या ओळखीचा गैरफायदा घेत त्या गाडीचालकाने या महिलेवर अत्याचार केल्याची घटना संगमनेर तालुक्यात घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर तालुक्यातील एक महिला तिच्या बहिणीला भेटण्यासाठी घोटी (ता. इगतपुरी) येथे गेली होती.
त्यानंतर ती काळीपिवळी छोटा हत्ती गाडीतून घरी परतत असताना गाडीचालक श्रीरंग पांडुरंग कटके उर्फ अंकुश पाटील (रा. सिन्नर) याने काही अडचण असेल, तर सांगत जा असे म्हणत गोड बोलून सदर महिलेचा मोबाइल नंबर घेतला.
त्यानंतर तो मोबाइल तिच्याशी वारंवार बोलू लागला.दरम्यान श्रीरंग कटके याने तुझ्या मोबाइलमधील सर्व डाटा माझ्या मोबाइलमध्ये घेतला आहे. तू जर माझ्याशी शरीरसबंध ठेवले नाही, तर तुझे फोटो तुझी बहीण व मेव्हणे यांना दाखवीन व व्हायरल करण्याची धमकी देत त्या महिलेवर वारंवार बलात्कार केला.
त्याशिवाय लोखंडी गजाने मारहाण करत स्कुटीची तोडफोड करून पिडीत महिलेच्या गळ्यातील अकरा ग्रॅम वजनाची सोन्याची चैन काढून घेतली. याप्रकरणी पिडीत महिलेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी श्रीरंग पांडुरंग कटके यास अटक केली.