ताज्या बातम्या

Hair Care : ‘या’ चुकांमुळे अवेळी पांढरे होतात केस, कोणत्याही उपचारांशिवाय घरबसल्या केस होतील काळे अन घनदाट

Published by
Ahmednagarlive24 Office

Hair Care : आपलेही केस काळे आणि लांबसडक असावेत, असे सगळ्यांना वाटत असते. मात्र काही जणांना कमी वयातच पांढऱ्या केसांच्या समस्येचा सामना करावा लागतो. अनेकदा केस पांढरे होण्यामागील कारणं लक्षात येत नाही. उपाय करूनही केस काळे होत नाही.

खर तर शरीरात असलेल्या मेलॅनिन नावाच्या रंगद्रव्याच्या प्रमाणावर आपल्या केसांचा तसेच त्वचेचा नैसर्गिक रंग अवलंबून असतो. जर शरीरात मेलॅनिनची कमतरता असेल तर केस अवेळी पांढरे होतात. त्यामुळे पांढरे केस पुन्हा काळे होऊ शकतात का? असा प्रश्न अनेकांना पडतो.

ही आहेत कारणे

1. व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता जाणवणे

जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता जाणवत असेल तर कमी वयात केस पांढरे होऊ शकतात. इतकेच नाही तर शरीराला ऊर्जा देण्यासोबतच हे जीवनसत्व केसांची वाढ आणि रंग टिकवून ठेवण्यासही मदत होते. लाल रक्तपेशी निरोगी ठेवण्यासाठी शरीराला या व्हिटॅमिनची गरज असते. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे केसांच्या गडद रंगासाठी जबाबदार असणाऱ्या मेलेनिनचे उत्पादन कमी होते.

2. धूम्रपान करणे

लहान वयात केस पांढरे होणे आणि धुम्रपान यांचा संबंध दिसून आला असल्याचे अनेक संशोधनांमध्ये समोर आले आहे. कारण धुम्रपानामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे केसांच्या मुळांना पुरेसे रक्त मिळत नाही. त्यामुळे केस अकाली पांढरे होतात.

3. ताण-तणाव

जर तुम्ही तणावात असाल तर तणावामुळे शरीरासह केसांचेही खूप नुकसान होते. त्यामुळे निद्रानाश, चिंता, भूक न लागणे, उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या निर्माण होतात. जे लोक खूप ताण घेतात, त्यांचे केस पांढरे होऊ असल्याचे अनेक संशोधनांमध्ये दिसून आले आहे.

करा हे उपचार

आवळ्याचा वापर करणे

आता यावर उपाय म्हणून तुम्ही पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी आवळ्याचा वापर करू शकता. तुम्ही रात्री नारळाच्या तेलात आवळा पावडर मिसळून थेट टाळूवर लावू शकता. त्यानंतर सकाळी शॅम्पूने धुवू शकता.

कढीपत्ता

काळ्या केसांसाठी मोहरीच्या तेलात किंवा खोबरेल तेलात काही कढीपत्ता शिजवा. हे लक्षात ठेवा की यासाठी आठवड्यातून दोनदा या तेलाने टाळूची मालिश करावी. नंतर शॅम्पू करा.

Ahmednagarlive24 Office