Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Hair Care : केसगळती खूप होतेय, वाढही थांबलीय? वापरा हे घरगुती तेल,कंबरेपेक्षाही लांब आणि घनदाट होतील तुमचे केस

Hair Care : आपले केस लांबसडक आणि घनदाट असावेत असे प्रत्येकाला वाटत असते. परंतु अनेकजण सततच्या केसगळतीने हैराण असतात. केसांची गळती होत असल्याने केसांची वाढ थांबते. अनेक उपचार करूनही या समस्येतून काहींची सुटका होत नाही.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

परंतु तुम्ही आता नैसर्गिकरित्या तयार केलेलं तेल वापरले तर तुमची या समस्येतून सहज सुटका होईल. हे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. इतकेच नाही तर या तेलामुळे तुमचे देखील केस कंबरेपर्यंत लांब आणि घनदाट होतील. कसे ते जाणून घ्या.

सध्याच्या धावपळीच्या काळात केसगळती आणि केस गळण्याच्या समस्येने प्रत्येकजण हैराण झाला असून सतत केस गळत राहिले तर केस कमी तर होतातच परंतु केसांची वाढही थांबली जाते. अनेकजण रासायनिक उत्पादनांच्या मदतीने या समस्यांपासून मुक्त होण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु अनेक उपाय करून समस्या वाढतात. त्यामुळे जर तुम्हाला तुमचे केस नैसर्गिकरित्या मजबूत आणि घट्ट करायचे असल्यास आता तुम्ही नैसर्गिक तेल घरीच तयार करू शकता.

आवळा तेल

साहित्य

 • मूठभर वाळलेला आवळा
 • 100 मिली नारळ तेल

असे बनवा तेल

 • आवळा तेल तयार करायचे असेल तर, सर्वात अगोदर मूठभर वाळलेला आवळा घ्यावा.
 • आता हा आवळा खोबरेल तेलात मिसळून बारीक वाटून घ्यावा.
 • त्यानंतर आता हे तयार तेल हवाबंद काचेच्या बाटलीत ठेवा.
 • ही बाटली एकूण 15 दिवस उन्हात ठेवावी.
 • त्यानंतर या बाटलीतील तेल गाळून ते साठवून ठेवा.

बदाम तेल

साहित्य

 • 1 टेबलस्पून बदाम तेल
 • 1 टेबलस्पून जोजोबा तेल
 • 1 व्हिटॅमिन ई कॅप्सूल
 • 4 थेंब रोझमेरी आवश्यक तेल

असे बनवा तेल

 • जर तुम्हाला बदामाचे तेल तयार करायचे असेल तर हे सर्व साहित्य एकत्र मिसळून घ्यावे.
 • आता हे तयार तेल एका काचेच्या बाटलीत भरा.
 • केस धुण्यापूर्वी ते एक रात्री केसांना लावून घ्या .

कढीपत्ता तेल

साहित्य

 • 3 चमचे नारळ तेल
 • मूठभर कढीपत्ता

असे तयार करा तेल

 • कढीपत्त्याचे तेल बनवायचे असेल तर सर्वात अगोदर खोबरेल तेल घ्या.
 • त्यानंतर त्यात मूठभर कढीपत्ता घालावा.
 • आता हे तेल काळे होईपर्यंत एका भांड्यात गरम करून घ्या.
 • हे तेल तापून देऊन एका बाटलीत भरावे.
 • हे लक्षात ठेवा की हे तेल वापरण्यापूर्वी ते थोडे कोमट करून घ्यावे.