संतापजनक : सात वर्षीय अल्पवयीन मुलीबरोबर अनैसर्गिक अश्लिल कृत्य

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :-  अहमदनगर शहरातील बोल्हेगाव येथे राहणाऱ्या एका सात वर्षीय अल्पवयीन मुलीबरोबर अनैसर्गिक अश्लिल कृत्य करणाऱ्या नातेवाइकाच्या विरोधात तोफखाना ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला पाथर्डी तालुक्यातून अटक करण्यात आली आहे.

बोल्हेगाव येथे राहणारे हे कुटुंब आहे. मुलीचे वडील खासगी ठिकाणी नोकरी करतात, तर आई ही घरगुती व्यवसाय करत आहे. चार दिवसापूर्वी त्या अल्पवयीन मुलीची आई ही बाहेरून आणलेले कपडे देण्यासाठी संबंधित व्यक्तीकडे जात असतानाच त्या वेळेला पाथर्डी येथील राहणारा तिचा नातेवाईक हा घरी आला व त्याने सहज भेटण्यासाठी आलो आहे, असे सांगितले.

त्याच वेळेला फिर्यादीने मी आणलेले कपडे घेऊन येते असे संबंधित व्यक्तीला सांगून सदर अल्पवयीन मुलीची आई ही तिच्या लहान मुलासमवेत बाहेर गेल्यानंतर ती अल्पवयीन मुलगी ही एकटी होती. आलेल्या त्या नातेवाईकाने त्या अल्पवयीन मुलीशी अनैसर्गिक अश्लील वर्तन केले.

आई घरी आल्यावर ती अल्पवयीन मुलगी घरामध्ये रडत बसलेली दिसून आली. घडलेली सर्व हकीकत आईला सांगितली. त्यानंतर संबंधित मुलीच्या आईने आज तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भामध्ये फिर्याद दिली.

अल्पवयीन मुलीवर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या तिच्या नातेवाईकाच्या विरोधात कलम 376 अ, ब, 377, 354, 354 अ, 354 ब, 506 सह पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पाथर्डी येथून पोलिसांनी अटक केलेली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24