अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- कर्ज फेडण्यासाठी पत्नीने माहेरहून एक लाख रूपये आणावेत. या मागणीसाठी राहुरी शहरातील सौ. संगिता सोपान हारदे या विवाहित महिलेला शिवीगाळ व मारहाण करण्यात आल्याची घटना दिनांक २८ जून रोजी घडली आहे.
सौ. संगिता सोपान हारदे वय ४५ वर्षे, राहणार वैद्य हाॅस्पिटलच्या मागे, राहुरी. यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दिनांक १३ मे २०२१ पासून आजपर्यंत म्हणजे सुमारे दिड महिन्यापासून आरोपी सोपान एकनाथ हारदे राहणार वैद्य हाॅस्पिटलच्या मागे.
याने त्याच्यावर झालेले कर्ज मिटवण्यासाठी एक लाख रुपये घेऊन ये. अशी वारंवार मागणी केली. त्यासाठी वेळोवेळी शिवीगाळ करुन, लाथाबुक्याने तसेच सांडशीने डोक्यात मारहाण करून जखमी केले.
तु जर माझेविरुध्द पोलीस स्टेशनला फिर्याद दिली तर तुला जिवे मारुन टाकीन. अशी धमकी दिली. सौ. संगिता सोपान हारदे यांनी तात्काळ पोलिसात धाव घेतली. आणि पोलिसा समक्ष घडलेला प्रकार कथन केला.
त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी सोपान एकनाथ हारदे याच्या विरोधात पैशाची मागणी करून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक शिवाजी खरात हे करीत आहेत.