अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- भेळ घेण्यासाठी आलेल्या ग्राहकाने एका ३४ वर्षीय विवाहित महिलेचा पदर धरला व तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

यावेळी त्या विवाहित महिलेचा पती व सासरा तिला सोडवण्यासाठी आले असता त्यांना मारहाण केल्याची घटना दिनांक ६ जुलै रोजी राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे घडली आहे.

राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे एक ३४ वर्षीय विवाहित तरूणी घरात एकटी असताना आरोपी बाळासाहेब सुरेश ताठे राहणार क्रांतीचौक बारगाव नांदूर. हा तेथे भेळ घेण्यासाठी आला होता.

भेळ घेतल्यानंतर त्याने त्या विवाहित तरूणीस पिण्यासाठी पाणी मागीतले. ती तरूणी पाणी आणण्यासाठी घरात जात असताना आरोपी बाळासाहेब ताठे याने तिच्या घरात अनाधिकाराने प्रवेश केला. आणि घराच्या दरवाजात आडवा उभा राहुन त्या तरूणीच्या साडीचा पदर ओढला.

तसेच तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. यावेळी त्या विवाहित तरूणीने आरडा ओरडा केल्यावर तिचे सासरे हे आरोपी बाळासाहेब ताठे याच्या ताब्यातुन सोडवण्यासाठी तेथे आले.

तेव्हा त्यांना लाथा बुक्याने मारहाण करण्यास सुरवात केली व घडलेला प्रकार कोणाला सांगीतला तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही. अशी जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर विवाहित तरूणीचा पती आरोपीला समजावून सांगण्यास गेला असता

आरोपी बाळासाहेब ताठे याने त्यालापण लाथा बुक्याने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. असे त्या विवाहित तरूणीने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

त्यानूसार आरोपी बाळासाहेब सुरेश ताठे याच्या विरोधात विनयभंग, मारहाण व जिवे मारण्याची धमकी देणे. आदि कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास हवालदार चव्हाण हे करीत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24