PPF Scheme : तुम्हीही कर वाचवण्यासाठी पीपीएफमध्ये गुंतवणूक केलीय का? जाणून घ्या ‘ही’ गोष्ट, नाहीतर…

पीपीएफ ही एक चांगला परतावा देणारी योजना आहे. त्यामुळे अनेकजण यात गुंतवणूक करतात. तर काहीजण कर वाचवण्यासाठी पीपीएफमध्ये पैसे गुंतवतात.

PPF Scheme : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ योजना ही खूप लोकप्रिय योजना आहे. कारण या योजनेत कोणत्याही जोखमेशिवाय चांगला परतावा मिळतो. तसेच गुंतवणूकदारही गुंतवणुकीत कोणतीही जोखीम घेण्यास तयार नसतात. त्याचप्रमाणे त्यांना कमी कालावधी जास्त परतावा हवा असतो.

त्यामुळे ते जोखमेशिवाय चांगला परतावादेणाऱ्या योजनेत गुंतवणूक करतात.पीपीएफ ही चांगला परतावा देणारी योजना आहे. तसेच काहीजण कर वाचवण्यासाठी या योजनेत गुंतवणूक करतात. जर तुम्हीही पैसे गुंतवले असतील तर वेळीच सावध व्हा. तुम्हाला काही गोष्टी माहिती असाव्यात.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

काय आहे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना

भारत सरकारचा पाठिंबा असलेली PPF ही योजना एक लोकप्रिय दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय आहे. जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला यावर आकर्षक व्याजदर आणि करमुक्त परताव्यासह सुरक्षितता मिळते. तसेच PPF द्वारे 80C अंतर्गत कर सूट मिळू शकते. केवळ योजनेच्या गुंतवणुकीवर मिळणारे व्याजच करमुक्त नाही, तर PPF आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत इतर कर लाभ दिले जातात.

असे आहेत फायदे

उदाहरणार्थ, समजा जर तुम्ही एका आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपये गुंतवले तर तुम्ही कर सवलतीचा दावा करू शकता. तसेच पीपीएफचे खूप फायदे आहेत. या योजनेअंतर्गत 15 वर्षांचा लॉक-इन कालावधी असून तुम्हाला 5 वर्षांनंतर काही रक्कम काढण्याची परवानगी देते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुम्ही पीपीएफमध्ये फक्त कर वाचवण्यासाठी पैसे गुंतवत असाल, तर तुम्हाला त्याच्या लॉक-इन कालावधीबद्दल काय ते माहित असावे.

असा मिळतो व्याज दर

PPF वर व्याज दर 7.1% प्रतिवर्ष मिळत आहे. अर्थ मंत्रालयाने दिलेला व्याज दर प्रत्येक महिन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवसाच्या दरम्यान मोजला जातो, तसेच जर मंत्रालयाद्वारे अधिसूचना जारी केली तर अधिसूचनेनुसार व्याज दर बदलतात.