Registration papers : तुमचीही घर नोंदणीचे कागदपत्रे हरवली आहेत? त्वरित करा ‘हे’ काम तातडीने करा, नाहीतर अडचणीत याल

Registration papers : सतत लोकांचे प्रॉपर्टीशी निगडित वाद होत असतात. यामध्ये अनेकांच्या बळजबरीने जमिनी बळकावून घेतल्या जातात.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

त्यामुळे अनेकांना हा प्रश्न पडतो की आपल्यासोबत अशी फसवणूक झाली तर काय करावे? किंवा तुमच्या नोंदणीची कागदपत्रे हरवली तर काय करावे? यासंदर्भात सर्व माहिती जाणून घेऊयात.

Advertisement

त्याचबरोबर जर तुमचे मालमत्तेची कागदपत्रे हरवली तर नोंदणी महानिरीक्षक किंवा उपनिबंधक यांच्याकडे लेखी कळवावे. त्यासाठी तुम्ही अगोदर स्टॅम्प पेपरवर हमीपत्र काढले पाहिजे.

यामध्ये मालमत्तेची संपूर्ण माहिती सोबतच हरवलेले कागद, एफआयआर आणि वर्तमानपत्रातील नोटेसीची माहिती द्यावी. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यास, हमीपत्राची नोंदणी करा.

Advertisement

तुमची नोटीस पास केल्यानंतर, तुम्हाला ती नोटीस रजिस्ट्रार कार्यालयात जमा करावी लागेल. त्यानंतर, तुम्हाला मालमत्तेच्या डुप्लिकेट कागदासाठी रजिस्ट्रार कार्यालयात डुप्लिकेट विक्री डीडसाठी अर्ज दाखल करावा लागेल.

Advertisement

अर्ज करत असताना, तुम्हाला त्या एफआयआरची एक प्रत त्याचबरोबर डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट, वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीची प्रत, नोटरीद्वारे प्रमाणित केलेले हमीपत्र आणि प्रक्रिया शुल्क निबंधक कार्यालयात जमा करावी लागेल. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या नावावर डुप्लिकेट डीड जारी केली जाईल.