महिलेची हत्या करून आरोपी बिनधास्त फिरत होता पण शेवटी झाले असे कि… वाचा अहमदनगर जिल्ह्यातील बातमी !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:-संगमनेर तालुक्यातील कर्‍हे शिवारातील मल्हारवाडी येथे शेतामध्ये अज्ञात महिलेचे प्रेत सोमवारी (ता.२२) दुपारी एक वाजेच्या सुमारास आढळून आले होते.

याबाबत संगमनेर तालुका पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत अहमदनगर येथील श्वान पथकाला पाचारण केले. यातील ‘रक्षा’ नावाच्या श्वानाने तेथे उपस्थित असलेल्या आरोपीला शोधून दिले.

यामुळे अवघ्या दोन तासांत गुन्ह्यातील आरोपीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. या धडाकेबाज कामगिरीबद्दल पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संगमनेर तालुक्यातील मल्हारवाडी शिवारात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. संगमनेर तालुका पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली.

मात्र, तेथे महिलेची ओळख पटणेही शक्य नव्हते, तर खुनी कसा शोधणार? पोलिसांनी सुरवातीपासून प्रयत्न केले. तपासासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले.

पथक रक्षा नावाच्या श्वानाला घेऊन आले. घटनास्थळावरील काही वस्तूंचा रक्षाला वास देण्यात आला. त्यानंतर रक्षाने आपले काम सुरू केले.

पोलिसांचा तपास पाहण्यासाठी ग्रामस्थ जमले होतेच. तेथे उपस्थित असलेल्या राजू शंकर कातोरे (रा. मल्हारवाडी, कऱ्हे, ता. संगमनेर) याच्याजवळ जाऊन रक्षा जोरजोराने भुंकू लागली.

हाच तो आरोपी आहे, असा श्वानांचा इशारा असतो. पोलिसांनी तो ओळखला. कातोरे याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने खुनाची कबुली दिली.

मृत महिलेचे नाव मंगला वामन पथवे (वय ४५, रा. उंचखडक, ता. अकोले) असल्याचे चौकशीतून पुढे आले. आरोपी कातोरे याच्यासोबत या महिलेने एका शेतावर वाटणीने काम घेतले होते.

त्याच्याशी संबंधित वादातूनच कातोरेने तिचा खून केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. दरम्यान श्वानपथकाच्या मदतीने आरोपी पकडला गेला.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून कातोरेला अटक केली. अवघ्या दोन तासांतच खुनाचा गुन्हा उघड झाला. श्वानपथक आणि पोलिसांचे ग्रामस्थांनी कौतुक केले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24