विठ्ठलाचे दर्शन घेवून ते आले मात्र … घरापासून अवघ्या वीस मिनिटांच्या अंतरावरच …?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra news : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेऊन माघारी येणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनाला झालेल्या अपघातात एका वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर दहा ते बारा वारकरी जखमी झाले आहेत. यातील जखमीपैंकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.

आष्टी तालुक्यातील हाकेवाडी फाटा परिसरात हा अपघात झाल. रावण सखाराम गाढे (५५, रा. धनगरवाडी, ता.पाथर्डी) असे या अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्याचे नाव आहे. पाथर्डी तालुक्यातील धनगरवाडी येथील वारकरी हे श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घेऊन पिकअप वाहनाने परत येत होते.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील हाकेवाडी फाट्यावर वारकऱ्यांची पिकअप खडीच्या ढिगारावर जाऊन उलटली. या अपघातात रावण गाडे यांचा जागीच मृत्यू झाला तर बंडू बाजीराव गाढे, हरी बबन चितळे, अशोक रावसाहेब चितळे, शोभा महादेव चितळे, गोरक्ष दादाबा गाढे, कोंडाबाई पंढरीनाथ गाढे, तुळशीराम नामदेव गाढे,

सुधाकर भाऊ गाढे सर्व रा.धनगरवाडी ता.पाथर्डी) हे जखमी झाले या सर्व जखमींना अहमदनगरच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गेली काही दिवसांपासून दिंडीत सहभागी तसेच एकादशीदिनी दर्शनासाठी गेलेल्या वारकऱ्यांनी शेकडो किलोमीटरचे अंतर पार केले होते. या सर्व वारकऱ्यांचे धनगरवाडी हे गाव अगदी पंधरा ते वीस मिनिटांच्या अंतरावर राहिले असताना ही अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.