तो पुन्हा आला…बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:-  जिल्ह्यातील बिबट्याची वाढती दहशत अद्यापही कायम आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर जीवघेणा हल्ला केला आहे.यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

त्याचबरोबर बिबट्याने अनेक प्राण्यांवर देखील हल्ले केले आहे. बिबट्याने कालवड, बैल, मेंढ्या शेळ्यांवर हल्ला करून त्यांना ठार केले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसह पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नुकतेच शेवगाव तालुक्यातील मजलेशहर येथे बिबट्याने हल्ला करून दोन शेळ्यांना ठार केल्याची घटना घडली. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या वर्षअखेरीस परिसरात बिबट्याचे दर्शन झाले होते.

या परिसरात दहशत माजविणाऱ्या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला अपयश आले होते. मात्र, नागरिकांना मजलेशहर परिसरातील वडुले रस्त्यावर बिबट्याने दर्शन दिले. त्याच रात्री दादासाहेब गोविंद म्हसरूप यांच्या दोन शेळ्यांवर हल्ला करून बिबट्याने त्यांना ठार केले.

त्यानंतर, परिसरातील गावांत बिबट्याची दहशत पसरली आहे. दरम्यान परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24