काळेंविरोधातील ‘तो’ गुन्हा खोटा… चौकशी करत कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- शहरातील एमआयडीसी मध्ये जिल्ह्यातील दोन मोठ्या नेत्यांमध्ये एक मुद्द्यावरून वाद झाले. यात एकमेकांची पोलखोल करण्याच्या नादात अनेक धक्कादायक प्रकार देखील घडले होते.

यातच काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल झालेला असून, या प्रकरणाची योग्य ती चौकशी करूनच पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्यासह युवा सेनेचे जिल्हा प्रमुख विक्रम राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे व भाजपचे माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, नगरसेवक मदन आढाव, माजी विरोधी पक्षनेता दशरथ शिंदे, नगरसेवक संग्राम शेळके, गौरव ढोणे, सागर गायकवाड आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्षकिरण काळे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून ३ ऑगस्ट रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणाची योग्य चौकशी करून पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी सातपुते यांच्यासह इतरांनी केली. विनयभंग गुन्हा प्रकरणात मला अटक होईल म्हणून मी पळून गेलो आहे. फरार आहे. अशा वावड्या जाणीवपूर्वक उठवल्या जात आहेत.

मात्र मी कुठेही पळून गेलेलो नाही अथवा फरार नाही. मी नगरमध्ये आहे. तसेच मी विनयभंगाच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन घेणार नाही, कारण मी गुन्हा केलेलाच नाही. असे काळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Ahmednagarlive24 Office