अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- कर्नाटक राज्यात दरोडा टाकून मुलीचा खून करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर तालुक्यातील वाकोडी फाटा येथे जेरबंद केला.
संतोष नंदू भोसले असे त्या आरोपीचे नाव असून तो सासुरवाडीला लपून बसला होता. कर्नाटक राज्यातील कलादगी पोलीस ठाणे हद्दीत अज्ञात आरोपींनी दरोडा टाकून मुलीची हत्या केली होती.
तर एका वृद्ध इसमाला जखमी करून नऊ तोळे सोने लंपास केेले होते. यातील एकाला कर्नाटक पोलिसांनी जेरबंद केले होते. तर दुसरा आरोपी संतोष भोसले वाकोडी फाटा येथे सासुरवाडीत लपून बसल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती.
त्यानुसार त्यांच्या पथकाने भोसले याला जेरबंद केले. आरोपी भोसले विरोधात जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.