अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:-सोमवारी दुपारी श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी शिवारात ५५ वर्षीय इसमाचा शिर नसलेला पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता.
त्यावर पोलीस उपाधीक्षक आण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले व सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली.
पोलीस उपाधीक्षक आण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी नातेवाईकांकडे याबाबत विचारपूस केली. मृतदेहाला शिर नव्हते.
त्यामुळे पोलीस डीएनए अहवालाशिवाय अधिकृतपणे कोणतीही माहिती जाहीर करणार नाहीत असे पोलिसांनी सांगितले. चार दिवसापूर्वी सापडलेला मृतदेह पुण्यातील असल्याचे सिध्द झाले आहे. अनैतिक संबंधातून खून करुन खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी हा मृतदेह टाकळी कडेवळीत शिवारातील जमिनीत पुरला होता.
याबाबत अवघ्या चार दिवसात पोलिसांना तपासात धागेदोरे मिळाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी मुंबई, पुण्याला पथके रवाना केली आहेत.