पुढील दहा दिवस अत्यंत महत्वाचे कोव्हिड टास्क फोर्समधील डॉक्टरांचा इशारा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-आज मितीला राज्याच्या अनेक भागांत कोरोना रूग्णांची संख्या अत्यंत वेगाने वाढत आहे. मुंबई आणि उपनगरांतही तीच परिस्थिती आहे.

विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करायचे की नाही याबाबतचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांवर सोडला आहे.

अमरावतीत सात दिवसांचा लॉकडाऊन घोषीत केला आहे. एकंदर या सर्व परिस्थितीत कोव्हिड टास्क फोर्समधील डॉ.राहुल पंडित यांनी मात्र चिंता व्यक्त केली आहे.

ते म्हणाले की, राज्यात कोरोनाची दुसरी लाट येणार का नाही हे पुढील १० दिवसांमध्ये स्पष्ट होईल. यावेळी कोरोना  रुग्णांची वाढ ही विदर्भातून सुरु झाली आहे.

मात्र आता ती राज्याच्या इतरही भागात देखील वेगाने पसरत असल्याचे सध्या चित्र आहे. या रुग्णवाढीमध्ये नवीन कोरोना विषाणूंच्या स्ट्रेनचा सहभाग आहे किंवा नाही हे सांगणे सध्या तरी कठीण आहे.

अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पुढील१० दिवस सर्वांसाठी महत्त्वाचे आहेत. मुंबईचे अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी २१ हजारांहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

कोरोनाची रुग्णसंख्या व पॉझिटीव्हमध्ये वाढ झाली आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत.

त्याचसोबत जम्बो कोव्हिड सेंटर्सला बेडची सोय तयार ठेवण्यासंदर्भातील सूचना देखील करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24