अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- दैनंदिन जीवनात आपण अनेकवेळा एकमेकांना मदत करतो व इतरांची देखील मदत घेतो. यात अनेकदाआपण पैसेही देतो अथवा घेतो. यात अनेकदा वादविवाद देखील झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
मात्र उसने घेतलेले ५०० रुपये वारंवार परत मागितल्याच्या कारणावरून एकाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना पुण्यात घडली आहे .
बसवराज (वय ३५) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर तानाजी बाबूराव पांढरे (वय ४५, रा. सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे. शिवाजीनगर रेल्वे स्टेशन पंप हाऊससमोर ही घटना घडली होती .
याबाबत अधिक माहिती अशी कि, बसवराज आणि तानाजी हे दोघेही फिर्यादीच्या वडापावच्या गाड्यावर कामावर होते. तानाजीने बसवराजकडून ५०० रुपये उसने घेतले होते.
हे पैसे बसवराज वारंवार परत मागत होता. या कारणावरून चिडून आरोपीने तानाजीने बसवराज याचा खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर युक्तिवाद करताना अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी ऍड. रमेश घोरपडे यांनी केली.
त्यावर सुनावणी करत अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एन. सोनवणे यांनी सने घेतलेले ५०० रुपये वारंवार परत मागितल्याच्या कारणावरून डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या तानाजी यास जन्मठेप आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.