अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- विवाहितेबरोबर प्रेम संबंध असल्याने तु माझे सोबत लग्न कर नाहीतर तुझ्या मुलास पळवुन नेईल असे म्हणुन एका मुलाला पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला श्रीगोंदा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सागर आळेकर (रा.श्रीगोंदा) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, औरंगाबाद येथिल बजाज नगर मध्ये राहणारे एका व्यक्तीच्या नातेवाईकांनी पोलीस निरीक्षक रामराव ढिकले श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांना माहीती दिली की,
फिर्यादीचा सहा वर्षांचा मुलगा अभिनव यास सागर आळेकर रा.श्रीगोंदा याने फिर्यादी व्यक्तीच्या पत्नी हीचे सोबत प्रेम संबंध असल्याने तु माझे सोबत लग्न कर नाहीतर तुझ्या मुलास पळवुन नेईल असे म्हणुन अभिनव यास त्याचे कडील कर मध्ये किडनॅप करुन श्रीगोंद्याकडे येत आहे.
पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना नगर दौड रोडवर पारगाव फाटा येथे नाकाबंदी करण्याचे आदेश देवुन तात्काळ रवाना केले.
नाकाबंदी दरम्यान सदर कार नगर कडुन दौंड कडे जाताना दिसल्याने ती थांबवुन त्यातुन आरोपी सागर गोरख आळेकर (वय 27 वर्षे,रा.आळेकरमळा,श्रीगोंदा) यास ताब्यात घेण्यात आले. तसेच त्याने पळवुन आणलेल्या 06 वर्षाच्या अभिनव रासकरला ताब्यात घेतले.
त्यानंतर पोलिसांनी मुलास त्याचे आईवडीलांच्या ताब्यात दिले. आरोपीस पुढील कारवाईसाठी फिर्यादी परशुराम रासकर यांचे फिर्यादीवरुन एम.आय.डी.सी.वाळुज, औरंगाबाद शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.