file photo

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :-  नगर-मनमाड रोडवरील प्रकाश वाईन्स या दारूच्या दुकानात डोळ्यात मिरचीपूड टाकून दुकानातील सुमारे १० लाख ७० हजार रूपये रक्कम चोरून नेली.

ही घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. काळ्या रंगाच्या नंबरप्लेट नसलेल्या मोटारसायकलवरून आलेले दोन व्यक्तींनी व्यवस्थपकांच्या चेहऱ्यावर व डोळ्यात मिरची पावडर फेकली, या गोंधळात ही चोरी झाली.

वाईन्सचे व्यवस्थापक आसीर बशीर शेक (रा. पंचवटीनगर, भिस्तबाग, सावेडी) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांत गुन्हा नोंदवला.