दारू दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लाखो रुपयांची रोकड लांबवली

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- नगर शहरासह जिल्ह्यात चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. यातच नगरमध्ये एक धाडसी चोरीची घटना घडली आहे.

नगर येथील एका वाईन शॉप व्यवस्थापकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून दुकानातील दहा लाखाहून अधिक रुपयांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवार (दि.१२) राञी काळया रंगाच्या नंबर प्लेट नसलेल्या मोटरसायकलवरून दोन अज्ञात चोरटे नगर – मनमाड प्रकाश वाइन्स दुकानात आले.

त्या चोरट्यांनी चेह-यावर व डोळयात मिरची पावडर टाकून दुकानातील काळया १० लाख ७० रुपये रक्कम असणारी काळ्या रंगाची हेण्ड बॅग चोरट्यांनी बळजबरीने चोरुन नेली.

दुकानाचे व्यवस्थापक आशोर शोर शेख यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक तपास तोफखानाचे सपोनि पिंगळे करीत आहेत. अत्यंत वर्दळीच्या परिसरात हे दुकान असल्याने एवढी धाडसी चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Ahmednagarlive24 Office