अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- नगर तालुक्यातून आज एक वाईट बातमी आली आहे. विळद घाट (ता. नगर) येथे धबधब्याखाली पाण्यात पाेहाेण्यासाठी गेलेल्या 14 ते 15 युवकांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी घडली.
मयूर परदेशी (रा. माेची गल्ली, नगर) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.या बाबत सविस्तर वृत्त असे कि, अहमदनगर शहरातील माेची गल्लीतील 14 ते 15 युवक रविवारी नगर तालुक्यातील विळद घाट येथील गवळीवाडा येथील धबधब्यावर फिरण्यास गेले हाेते.
धबधब्याखाली असलेल्या पाण्यात युवक पोहत होते. परंतु, त्यांच्यापैकी तीन युवक पोहताना बुडण्याच्या बेतात होते. त्यांना मयूर परदेशी याने स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले.
दोघांना सुरक्षितपणे पाण्याबाहेर काढले, परंतु तिसऱ्या युवकाला पाण्याबाहेर आणताना मयुरचा दम तुटला आणि तो स्वतः पाण्यात बुडाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे .