वडिलांकडून 1 लाख रुपये उधार घेऊन उभी केली 10 हजार कोटींची ‘ही’ प्रसिद्ध कंपनी, आता सामाजिक कार्यासाठी केले ‘असे’ काही

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:- इलेक्ट्रिक उपकरण उत्पादक व्ही-गार्ड इंडस्ट्रीजचे प्रमोटर आणि चेअरमन एमेरिटस कोचोउसेफ चित्तिलापिल्ली यांनी 90  कोटींच्या शेअर्सची विक्री केली. चित्तिलापिल्लीने सामाजिक कार्यासाठी कंपनीत 40 लाख शेअर्सची विक्री केली. समभाग विक्रीतून उभा केलेला पैसा परोपकारी कामांसाठी वापरला जाईल.

17 फेब्रुवारी, 2021 रोजी 40 लाख शेअर्स विकले गेले, असे चित्तिलापिल्लीने एक रेगुलेटरी फाइलिंगमध्ये  म्हटले आहे. सामाजिक कार्यासाठी माझ्या बांधिलकीचा भाग म्हणून, मी  दोन उपक्रम हाती घेतलेले आहेत. त्यातला पहिला म्हणजे फंड उभारणे.  चित्तिलापिल्लीच्या म्हणण्यानुसार के चित्तिलापिल्ली फाउंडेशन (KCF)  ची स्थापना  सेवाभावी आणि परोपकारी कार्यासाठी केली गेली आणि ‘चित्तिलापिली स्क्वेअर’ (सीएस) नावाचा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.

त्याचे काम प्रगतीपथावर आहे आणि या प्रकल्पासाठी शेअर्स मधून एकत्रित केलेली रक्कम वापरली जाईल. ते म्हणाले, केसीएफ वर्षानुवर्षे उद्योजकता विकासाच्या क्षेत्रात कार्यरत आहे.

वडिलांकडून कर्ज घेत कंपनी सुरू केली होती –
वयाच्या 27 व्या वर्षी के चित्तिलापिल्लीने वडिलांकडून कर्ज घेऊन स्टेबिलायझर्स बनविण्यासाठी एक छोटासा कारखाना सुरू केला. वडिलांकडून घेतलेले 1 लाख आणि दोन कर्मचार्‍यांच्या मदतीने त्याने  सुरुवात केली. व्ही-गार्ड ब्रँडसह स्टेबलायझरची विक्री वाढली. आता कंपनी स्टेबलायझर्स व्यतिरिक्त इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रो-मेकॅनिकल उत्पादने बनवते.

व्ही-गार्ड इंडस्ट्रीजची मार्केट कॅप 10 हजार कोटींच्या पुढे गेली –
व्ही-गार्ड इंडस्ट्रीज स्टॉक मार्केटमधील लिस्टेड कंपनी आहे. 1 लाख रुपयांच्या भांडवलापासून सुरू झालेल्या कंपनीची मार्केट कॅप आता 10 हजार कोटींच्या पुढे गेली आहे.

शुक्रवारी बीएसई वर व्ही-गार्डचा शेअर 233.80 रुपयांवर बंद झाला. ते म्हणाले, भागभांडवलाची रक्कम परोपकारी कामात वापरली जाईल.

या किंमतीला विकले 40 लाख शेअर्स –
चित्तिलापिल्लीने 17 फेब्रुवारीला प्रति शेअर 225.15 रुपये किंमतीने 40 लाख शेअर्स विकले. त्याने शेअर विक्रीतून 90 कोटी रुपये जमा केले. ते म्हणाले, भागभांडवलाची रक्कम परोपकारी कामात वापरली जाईल. चित्तिलापिल्ली म्हणाले की, ज्या व्यवसायिकांना निधीची कमतरता भासते त्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी त्यांना मदत करायची आहे.

त्यांच्या उचित दर आणि अटींवर कर्ज देण्यासाठी के. चित्तिलाप्पिली कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी स्थापन केली आहे. यासाठी आरबीआय   कडून नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (एनबीएफसी) म्हणून नोंदणीसाठी अर्ज केला गेला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24