दोघा लहान मुलांना ‘धाक’ दाखवून नराधमाने केले त्याचे लैंगिक शोषण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

एका नराधमाने दोघा लहान मुलांना ‘धाक’ दाखवून त्याचे लैंगिक शोषण केले. या प्रकरणी दोन्ही बालकांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित आरोपी सचिन चांगदेव केदारी याला गजाआड करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, पोलीस ठाण्याच्या परिसरात राहणार्‍या बारा व तेरा वर्षीय मुलांना संशयित आरोपी सचिन चांगदेव केदारी (रा.देवाचा मळा, संगमनेर) याने ‘तुम्ही बांधकामाचे गज चोरले आहेत,

ही गोष्ट मी तुमच्या घरीच सांगतो’ असे म्हणून त्या बालकांना आरोपी मजकूर याने ‘धाक’ दाखवला. त्यानंतर त्याने दोन्ही बालकांना वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी घेवून गेला.

तेथे आरोपीने त्या निरागस बालकांना दमबाजी करीत त्यांच्याशी अश्लिल चाळे करण्यास सुरुवात केली.

त्याच्या या कृत्याला त्या बालकांनी विरोध केला असता आरोपीने पुन्हा दमबाजी सुरु केली. असा प्रकार या दोघांसोबत दोनवेळा घडल्यानंतर संबंधित पीडित मुलांनी सदरचा प्रकार आपल्या पालकांना सांगीतला.

त्यानंतर गुरुवारी (ता.8) रात्री दोन्ही बालकांच्या पालकांनी पोलीस ठाणे गाठले. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दोन्ही बालकांना विश्वासात घेवून संपूर्ण प्रकार समजून घेतला.

त्या दोघांनी सांगितलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपी सचिन चांगदेव केदारी याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला तत्काळ अटक केली आहे. आज त्याला न्यायालयासमोर हजर करुन त्याची पोलीस कोठडी मागितली जाणार आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24