अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- अनिल बारहाते हा तरूण दिनांक १० ऑगस्ट रोजी रस्त्याच्या कडेला लघूशंकेसाठी उभा राहिला होता. यावेळी आरीपींनी चोर चोर असा आरडाओरडा करून त्याला लोखंडी गज व लाकडी दांड्याने जबरदस्त मारहाण करून गंभीर जखमी केले.
अनिल बारहाते या तरूणावर लोणी येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अनिल दशरथ बारहाते वय ३० वर्षे राहणार कुरणवाडी ता. राहुरी. हा तरुण दिनांक १० ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजे दरम्यान बारागाव नांदूर येथील मंडलिक आखाडा येथे रस्त्याच्या कडेला लघूशंका करण्यासाठी थांबला होता.
यावेळी आरोपी सुरेश भूसारी व पाराजी भूसारी या दोघां जणांनी चोर चोर असा आरडाओरडा केला. तसेच त्याला लोखंडी गज व लाकडी दांड्याने जबरदस्त मारहाण करून गंभीर जखमी केले. अनिल बारहाते या तरूणाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर लोणी येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अनिल दशरथ बारहाते याने लोणी पोलिसांना जबाब दिलाय. लोणी पोलिसांकडून मिळालेल्या अहवालानूसार आरोपी सुरेश गंगाधर भुसारी व पाराजी गंगाधर भुसारी दोघे राहणार मंडलिक आखाडा, बारागाव नांदूर, ता. राहुरी. या दोघांविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात जबरदस्त मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक संजय जाधव हे करीत आहेत.