प्रशासनाची कारवाई टाळण्यासाठी त्यांनी केला जुगाड…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-करोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने नियमांचे पालन करा, असे आदेश दिले आहेत.

मात्र या नियमांचे नागरिकांमधून पालन केले जात नाही. विवाह सोहळ्यांना होणारी प्रचंड उपस्थिती करोना वाढीस कारणीभूत ठरत आहे.

दरम्यान करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे प्रशासनाने मंगल कार्यालय आणि लॉनच्या तपासण्या सुरू केल्यामुळे अनेक नागरिक विवाह व इतर समारंभ मंगल कार्यालयात आयोजित न करता आपल्या घरी,

शेतात, धार्मिक स्थळी किंवा सामाजिक सभागृहात आयोजित करत आहेत. अशा सोहळ्यात व्यक्तींच्या संख्येच्या निर्बंधांचे पालन होत नसल्याचे दिसत आहे.

वधू पिता स्वतःच्या घरासमोर मंडप टाकून विवाह सोहळ्याचे व इतर कार्यक्रम उरकून घेत आहेत. याठिकाणी नागरिकांची मोठी उपस्थिती असते. याकडे मात्र प्रशासन दुर्लक्ष करत आहे.

जर मंगल कार्यालयांना उपस्थितीचे बंधन असेल तर घरासमोर होणार्‍या कार्यक्रमांकडे दुर्लक्ष का केले जाते? असा सवाल मंगल कार्यालय चालकांनी उपस्थित केला आहे.

घरगुती विवाह सोहळ्याबाबतही प्रशासनाने सतर्क रहावे. ग्रामपंचायत क्षेत्रांमधील प्रत्येक विवाह सोहळ्यासाठी तेथील तलाठी,

ग्रामसेवक व पोलीस पाटील यांनी उपस्थित राहून तेथील उपस्थितांची संख्या मोजावी जेथे 50 पेक्षा अधिक व्यक्ती विवाह समारंभात आढळून येतील तेथे तात्काळ दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी मंगलकार्यालय चालकांकडून होत आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24