कोरोना रुग्णवाढीमुळे जिल्ह्यातील ‘हे’ गाव पाच दिवस बंद !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- नेवासे तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक बाधित रुग्ण झपाट्याने सापडत आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून गावातील कोरोना समितीने बेलपिंपळगाव शनिवारपासून पाच दिवस बंद पाळण्यात येणार आहे.

या काळात गावातील रुग्णालये, मेडिकल, दुग्धव्यवसाय वगळता इतर सर्व व्यवहार बंद करणार असल्याचे सांगितले. गावातील आठवडे बाजार, हॉटेल, किराणा दुकान, कापड दुकान, तसेच इतर सर्व दुकान बंद असतील, गावात इतर विना काम फिरणारे व विना मास्क फिरणारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

आर्थिक दंड देखील करण्यात येणार आहे. जर या काळात दुकान उघडे सापडले, तर ११०० रुपये दंड होईल आणि दसऱ्यांदा दुकान उघडे आढळले, तर ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार अाहेत.

त्यामुळे दुकानदार लोकांनी सहकार्य करावे, गावातील सर्व धार्मिक स्थळ देखील या काळात बंद असणार आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेत अनेक रुग्ण गावात सापडत असल्याने नागरिकांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. त्यामुळे आपला गाव सुरक्षित राहील.

अहमदनगर लाईव्ह 24