अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-राहुरी तालुक्यात कोरोना रूग्णांमधे झपाट्याने वाढ होत आहे.बहुतेक ठिकाणी रूग्णालयात देखील उपचारासाठी जागा मिळत नाही.
त्यामुळे बहुतेक रूग्ण हे घरीच उपचार घेत असल्याचे समोर येत आहे.त्यामुळे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी गाव तेथे क्वारटाईन सेंटर उभारण्यासाठी पुढाकार घेतला असुन त्यादृष्टीने संबधितांना सुचना देखील केल्या आहे.
रविवार सायंकाळी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग मध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. या ऑनलाइन बैठकिला प्रशिक्षणार्थी प्रांत अधिकारी दयानंद जगताप,तहसीलदार फसियोद्दीन शेख,
गटविकास अधिकारी गोविंद खामकर,मंडलाधिकारी दत्ता गोसावी, तालुका वैद्यकीय अधिकारी दिपाली गायकवाड,विविध विभागातील मंडलाधिकारी,तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील आदिं सहभागी झाले होते.
गावांमधील सौम्य लक्षणे असणारे व रूग्णांच्या संपर्कात आलेल्यांना आता गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेमधे कांरटाईन करण्यात येनार आहे.यामधे प्रामुख्याने सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक,ग्रामपंचायत शिपाई,
कोतवाल,अंगणवाडी सेविका,आशा सेविका आदिंना नेमूनक करण्यात येणार आहे.त्यामुळे आता जिल्हा परिषद शाळेचा ऊपयोग क्वारंटाईन सेंटर म्हणून केला जाणार आहे.परिणामी रूग्ण संख्या देखील आटोक्यात आणण्यास मदत होणार आहे.