अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- स्पर्धा परीक्षांमध्ये पास होऊन सरकारी नौकरी मिळवण्यासाठी अनेक जण मेहनत घेऊन परीक्षा देतात तर काहीजण गैरप्रकार करतात.
मात्र अशा गैरप्रकारला आळा बसवा यासाठी भरारी पथके देखील सतर्क असतात. नुकतेच अशाच दोघा भामट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या ‘क’ वर्ग पद भरतीमध्ये डमी विद्यार्थी आढळल्याचा प्रकार नगर शहरामध्ये उघडकीस आला आहे.
याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. शहरातील प्रेमराज सारडा महाविद्यालयात हा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, एक मुळ परीक्षार्थी, एक डमी विद्यार्थी, त्यांना मदत करणारा एक व्यक्ती अशा तिघांना ताब्यात घेतले आहे. सर्व जालना जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. राज्यात आज आरोग्य विभागाचा पेपर झाला आहे.
जिल्ह्यात २९ केंद्रावर ही परीक्षा होत असून त्यासाठी १७ हजार ८१२ विद्यार्थी बसले आहेत. या दरम्यान शहरातील प्रेमराज सारडा महाविद्यालयात हा गैरप्रकार उघडकीस आला आहे.