संशयीत म्हणून ताब्यात घेतले मात्र तो निघाला अट्टल…!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :-  रात्री गस्तीवर असलेल्या पोलिस पथकाने एका संशयीत तरुणास ताब्यात घेतले होते.

मात्र अधिक चौकशी केली असता तो चोरी, दरोडे अशा विविध गुन्ह्यातील आरोपी तसेच औरंगाबाद येथील दरोड्याच्या गुन्ह्यात एक वर्षापासून फरार असलेला आरोपी समीर शब्बीर शेख असल्याचे समोर आले आहे.

कार्यवाही पूर्ण करून त्याला औरंगाबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी, काल मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव,

हे गस्त घालत असताना राहुरी पोलिस ठाणे हद्दीतील देवळाली प्रवरा येथील डेपो चौक ते दवणगावला जाणाऱ्या रोडवर शिक्षक कॉलनी देवळाली प्रवरा येथे एक तरूण संशयीतरित्या मिळुन आला. त्याला पोलीस पथकाने हटकले असता तो पळू लागला.

यावेळी त्याला पोलिस पथकाने पाठलाग करुन मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आणि राहुरी पोलीस ठाण्यात आणले. त्याच्याकडे विचारपुस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला; परंतु त्याला पोलिसी खाक्या दाखवताच

त्याने त्याचे नाव समीर शब्बीर शेख (वय २१ वर्षे, रा. खटकाळी, ता. राहुरी) असे असल्याचे सांगितले. पोलीस पथकाने त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने औरंगाबाद येथे दरोडा टाकण्याच्या तयारीच्या गुन्ह्यात फरार आहे,

असे कबुल केले व तो जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने परिसरात फिरत असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याच्यावर राहुरी पोलिसांनी कारवाई करुन औरंगाबाद पोलिसांच्या स्वाधीन केले.

अहमदनगर लाईव्ह 24