अहमदनगर Live24 टीम, 16 जुलै 2021 :- काही लोक माझ्यावर टिका करू लागले आहेत. त्यांनीच विमानातून रेमडेसीविर इंजेक्शन आणले, त्यांनीच लोकांना व्हिडीओ दाखविला.
परंतू ते इंजेक्शन वाटले कुणाला ? असा सवाल करीत आमदार नीलेश लंके यांनी खासदार सुजय विखे यांना प्रत्युत्तर दिले.तालुक्यातील पळशी येथे विविध समित्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या सत्कारानिमित्त आयोजित कार्यक्रमात लंके बोलत होते.
कारोना काळात लंके यांनी केलेल्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत खा. सुजय विखे यांनी आम्हीही कोरोना काळात काम केले, मात्र त्याचा व्हिडीओ व्हायरल करून गाजावाजा केला नाही असा टोला आ. लंके यांचे नाव न घेता लगवला होता.
त्यास लंके यांनी प्रत्युत्तर देत खा. विखे यांना चांगलेच फटकारले. आ. लंके म्हणाले, पूर्वी तालुक्यातील पुढाऱ्यांना माझी भिती वाटायची आता जिल्हयातील पुढाऱ्यांना वाटू लागली आहे. त्यांनीच विमानातून रेमडेसिवीर इंजेक्शन आणली. लोकांना व्हिडीओ दाखविला. परंतू ती इंजेक्शन वाटली कोणाला ? असा सवाल त्यांनी केला.
खा. विखे यांच्या संस्थेतील कर्मचाऱ्यावरही आम्ही उपचार करून कोरातून बरे केले. त्याचा गाजावाजा आम्ही केला नाही. त्या कर्मचाऱ्यास खासदारांनी त्यांच्या रूग्णालयात दाखल करण्यास सांगितले. डॉक्टरांनी मात्र आम्हाला काही सांगितलेले नाही, आगोदर पैसे भरा व त्यानंतर उपचार करण्यात येतील असे सांगितले.
पैसे नसल्याने तो कर्मचारी भाळवणी येथील आरोग्य मंदीरात दाखल झाला. एक रूपयाही खर्च न करता त्याने कोरोनावर मात केली. जिल्हयातही आम्ही सक्षम आहोत. असे आ. लंके म्हणाले. राजूर येथील सहाय्यक प्रकल्प अधिकारी अशोक काळे, सुजाता शेरखाने, आत्मा समितीचे अध्यक्ष राहूल झावरे,
राष्ट्रवादी विदयार्थी माहीती व तंत्रज्ञान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष जितेश सरडे, ठकाराम लंके, बाळासाहेब लंके, बापूसाहेब शिर्के, संदीप चौधरी, अजय लामखडे, दत्ता कोरडे, जगदीश गागरे, सत्यम निमसे, योगेश शिंदे, संदीप रोहकले, सुरज भुजबळ, बंडू कुलकर्णी, श्रीरंग रोकडे, अप्पासाहेब शिंदे, गणेश मधे, मिठू जाधव, गणेश हाके, प्रविण गागरे, सुखदेव चितळकर आदी यावेळी उपस्थित होते.