अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :-रुग्णांमध्ये जर डेंग्यूबरोबरच डेंग्यूच्या तापाची लक्षणं दिसत असतील तर त्याला जवळच्या दवाखान्यात घेऊन जायला हवं. जेणेकरून डेंग्यूच्या प्रकाराच्या पुष्टीसाठी आवश्यक तपासणी करता येईल.
यामुळे डॉक्टर रुग्णाची स्थिती लक्षात घेऊन आवश्यक उपचारांना सुरुवात करतात. डेंग्यूच्या तापात रुग्णाच्या रक्तामध्ये असणाऱ्या प्लेटलेट्सची संख्या अत्यंत कमी होते. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, डेंग्यूच्या प्रत्येक रुग्णाला प्लेटलेट्स चढविण्याची आवश्यकता नसते.
योग्य आहाराद्वारे प्लेटलेट्स पेशी आपोआप बनतात. जर रुग्णावर योग्य वेळेस योग्य उपचार केले तर रुग्ण पूर्णपणे बर होऊ शकतो.
जर डेंग्यूच्या तापाविषयी वेळीच समजले तर यावर घरीच इलाज करणे सहजशक्य आहे.
त्यासाठी रुग्णाला दवाखान्यात दाखल करण्याची अजिबात आवश्यकता नाही. ० पाच दिवसांपेक्षा जास्त काळ ताप असेल तर रक्त तपासणी अवश्य करा.
तीव्र ताप आल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने पॅरेसिटामोल औषध घ्या, जेणेकरून ताप तत्काळ नियंत्रणात राहील.
डेंग्यूच्या रुग्णाने आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवे. रुग्णाने पुरेशा प्रमाणात पौष्टिक आहाराचं सेवन करायला हवे, कारण तापाच्या स्थितीत अधिक आहाराची आवश्यकता असते.
रुणाच्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी रुग्णाने पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थांचं सेवन करायला हवे. रूणाने उकळलेलं पाणी प्यावं.
रोगप्रतिकार क्षमता कशी वाढवाल ? : – पावसाळ्यात संसर्ग होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. म्हणून घरीच आयुर्वेदिक काढा पिऊ शकता. त्यासाठी एक लिटर पाण्यात कुटलेली सुंठ, तुळशीची पानं, गुळवेलीचा गर, कडुलिंब, पपईची पानं मिसळा. हे पाणी चागल उकळू द्या. जेव्हा एक चतुर्थांश पाणी राहील तेव्हा ते गाळून प्या.
बचावासाठी उवयुक्त : – डेंग्यूच्या तापाच्या दरम्यान क जीवनसत्त्व अधिक असणारे पदार्थ म्हणजे आवळा, संत्र किंवा मोसंबी अधिक प्रमाणात खा. यामुळे शरीराचं सुरक्षाचक्र मजबूत होतं. आहारात हळदीचं प्रमाण वाढवा. तुळशीची पानं उकळवून त्यात मध मिसळून प्या.
बकरीचं दूध : – डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी बकरीचं दूध रामबाण उपाय आहे. बकरीच्या दुधात प्रथिनं गाय, म्हशीच्या पपया जटिल नसतात. त्यामुळे रोगप्रतिकार क्षमतेवर प्रतिकूल परिणाम होत नाही.
गुळवेलीचं पाणी : – सगळ्यात आधी गुळवेलीच्या देठाचे छोटे छोटे तुकडे करा. दोन ग्लास पाण्यात देठ उकळवा, जेव्हा पाणी अर्ध होईल, तेव्हा गाळून घ्या. त्यानंतर कोमट झाल्यावर प्या.