अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेचा उद्रेक झाला असून दरदिवशी हजारोंच्या संख्येने बांधितांची भर पडते आहे. यामुळं जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
यातच वैद्यकीय सेवा अपुऱ्या पडत असल्याने नागरिकांना प्राणाला मुकावे लागते आहे. मात्र अनेक दानशुर व्यक्ती, संस्था या परिस्थिती मदतीसाठी सरसावत आहे. अशीच एका संस्थेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 30 ऑक्सिजन कॉन्सट्रटर उपलब्ध करून दिले आहे.
जिल्ह्यामध्ये करोनाची परिस्थिती अतिशय बिकट असून ऑक्सिजन व व्हेंटिलेटर मोठी गरज निर्माण झालेली आहे. या कठीण परिस्थितीची जाण ठेवत व सामाजिक बांधिलकी
जपत आरोग्य सेवेत उत्तम काम करणार्या स्वास्थ्य या संस्थेने नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 30 ऑक्सिजन कॉन्सट्रटर उपलब्ध करून देण्यात आले.
यातील प्रत्येकी ऑक्सिजन कॉन्सट्रटर किंमत 1 लाख रुपये असून 30 युनिटची किंमत 30 लक्ष आहे. या ऑक्सिजन कॉन्सट्रटर यंत्रामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचणार आहेत.
प्रशासनाला संकटाच्या काळात केलेल्या सहकार्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. राजेद्र भोसले व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी संस्थेचे आभार मानले आहे.