Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Health Insurance Plan : आरोग्य विमा घेत असाल तर विसरू नका ‘या’ गोष्टी, नाहीतर तुम्हालाही या सुविधांपासून राहावे लागेल वंचित

जर तुम्ही आरोग्य विमा घेत असाल तर त्यापूर्वी त्याबद्दल तुम्हाला सर्व माहिती असणे आवश्यक आहे. नाहीतर याचा फटका तुम्हाला बसू शकतो.

Health Insurance Plan : सध्याच्या काळात आरोग्य विमा ही गरज बनली आहे. अनेकजण आरोग्य विमा घेत असतात. जर तुम्हाला वैद्यकीय बिलावर होणार खर्च नियंत्रणात ठेवायचा असल्यास लवकरात लवकर चांगली आणि परवडणारा आरोग्य विमा घ्यावा. धावपळीच्या काळात अनेकजण आपल्या आरोग्याकडे नीट लक्ष देत नाहीत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

त्यामुळे त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. अशातच दिवसेंदिवस नवनवीन आजार येत आहेत. साहजिकच आजार नवीन असल्याने दवाखान्याचे बिलही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आरोग्य विमा असणे गरजेचे आहे. अशातच तुम्ही आरोग्य विमा घेत असाल तर काही गोष्टी विसरू नका. नाहीतर तुम्हालाही काही सुविधांपासून वंचित राहावे लागणार आहे.

टॉप-अप डिडक्टेबल

टॉप-अप प्लॅनमध्ये वजावटही देण्यात येत असून जी वेगळ्या पद्धतीने काम करते. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की टॉप-अप डिडक्टेबल म्हणजे काय? तर वजावट म्हणजे ‘बेस पॉलिसी किंवा विमाधारक दाव्याची किंमत किती प्रमाणात सहन करतो’. या प्लॅनमध्ये तुम्हाला तुमची मूळ विमा योजना नाममात्र प्रीमियममध्ये वाढवता येतो. या पॉलिसीचे दोन प्रकार असून यापैकी एक म्हणजे रेग्युलर टॉप-अप आणि दुसरा म्हणजे सुपर टॉप-अप रेग्युलर टॉप-अप.

काय असते वजावट?

समजा तुमची वजावटीची रक्कम रु. 3,000 इतकी आहे आणि तुमच्या हक्काची रक्कम रु. 20,000 इतकी आहे. तर याचा अर्थ विमा कंपनी नुकसानीसाठी 17,000 रुपये देऊ शकते त्यामुळे तुम्हाला 3,000 रुपये सहन करावे लागणार आहेत. वजावटीच्या रकमेपर्यंतचा कोणताही दावा कंपनीद्वारे देय नसते.

विम्यामध्ये दोन प्रकारच्या वजावट असून एक म्हणजे अनिवार्य वजावट ही एक निश्चित रक्कम असते. जी विमा कंपनी पॉलिसीमध्ये ठेवण्यात येते. या अंतर्गत दाव्याचा प्रारंभिक भाग विमाधारक सहन करतो. तर उर्वरित रक्कम विमा कंपनी देते त्यामुळे या वजावटीचा प्रीमियमवर फारसा परिणाम होत नाही.

दुसरी म्हणजे ऐच्छिक वजावट या अंतर्गत, विमाधारकाला ऐच्छिक वजावटीची मर्यादा निवडता येते. पॉलिसीधारक दाव्याचा ठराविक भाग भरणे निवडत असून रक्कम व्यक्तीपरत्वे बदलत असते.