Health News : शरीरात प्रोटीनची कमतरता असताना दिसतात ‘ही’ 5 लक्षणे, दुर्लक्ष केल्यास होईल वाईट….

Published by
Ahmednagarlive24 Office

Health News :- प्रोटीन केवळ आपले स्नायू मजबूत करत नाहीत तर शरीराला ऊर्जा देण्याचे देखील काम करतात. तसेच प्रोटीन एंटीबॉडीज तयार करण्यास मदत करत असतात, जे संक्रमण आणि रोगांशी लढण्यासाठी काम करतात. हे आपल्या त्वचेचे, एन्झाईम्स आणि हार्मोन्सचे बिल्डिंग ब्लॉक सुद्धा आहे.

शरीरात प्रोटीनच्या कमतरतेमुळे आपल्याला खूप त्रास होऊ शकतो. यामध्ये काही लक्षणे शरीरात प्रोटीनची कमतरता दर्शवतात, जी समजून घेणे फार महत्वाचे आहे.

अवयवांना सूज येणे – शरीराच्या कोणत्याही भागात सूज येऊ लागते, त्याला वैद्यकीय भाषेत एडिमा म्हणतात. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, मानवी सीरम अल्ब्युमिनच्या कमतरतेमुळे अवयवांमध्ये सूज येते, जे रक्त किंवा रक्ताच्या प्लाझ्माच्या द्रव भागात असते. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही भागात सूज आल्यास दुर्लक्ष न करता डॉक्टरशी संपर्क केला पाहिजे.

यकृत समस्या – शरीरात प्रोटीनच्या कमतरतेमुळे यकृताशी संबंधित समस्या देखील वाढू शकतात. खरे तर प्रोटीनच्या कमतरतेमुळे यकृताच्या पेशींमध्ये चरबी जमा होऊ लागते.

त्यामुळे यकृताला जळजळ, जखमा किंवा यकृत निकामी होण्याची शक्यता वाढते. जे लोक जाड आहेत किंवा जे अति प्रमाणात मद्यपान करतात त्यांच्यामध्ये ही समस्या अधिक आढळून येते.

त्वचा, केस आणि नखे – प्रोटीनच्या कमतरतेचा परिणाम आपल्या त्वचेवर, केसांवर आणि नखांवरही स्पष्टपणे दिसून येतो. प्रोटीनच्या कमतरतेमुळे त्वचेला तडे जाऊ लागतात.

त्वचेवर लाल ठिपके किंवा डाग दिसू लागतात. केस कमकुवत होऊन गळू लागतात. तसेच नखे पातळ होऊ शकतात आणि त्यांचा आकारही बिघडू शकतो.

कमकुवत स्नायू – स्नायू मजबूत करण्यात प्रोटीन सर्वात जास्त भूमिका बजावतात. शरीरात प्रोटीनची कमतरता असल्यास, शरीराच्या कार्यासाठी आणि आवश्यक उतींसाठी शरीर हाडांमधून प्रथिने घेण्यास सुरुवात करते. त्यामुळे स्नायू कमकुवत होण्यासोबतच हाड तुटण्याचा धोका हि वाढतो.

संसर्गाचा धोका – प्रोटीनच्या कमतरतेमुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवरही वाईट परिणाम होतो. प्रोटीनच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारक शक्ती योग्यरित्या कार्य करू शकत नाही.

परिणामी खराब प्रतिकारशक्तीमुळे रोगांचा धोका लक्षणीय वाढतो. एका अभ्यासानुसार, वयोवृद्ध लोकांमध्ये सलग 9 आठवडे प्रोटीनच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारक शक्तीवर वाईट परिणाम होतो

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office