आरोग्य अधिकाऱ्यांची बर्थडे पार्टी भोवणार; आयुक्तांनी कारवाईच्या नोटीस बजावल्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु असून परिस्थती अद्यापही गंभीर आहे. यातच कोरोनाला आळा घालण्यासाठी कठोर निर्बंध घालण्यात येत असताना मात्र दुसरीकडे आरोग्य अधिकाऱ्यांनी या सर्व नियमांना पायदळी तुडवत जंगी पार्टी केली.

आता हीच पार्टी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यामुळे आता कारवाईचा टांगती तलवार कर्मचाऱ्यांवर पडणार आहे. महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी कोरोनाचे सर्व नियम धुडकावत कार्यालयातच वाढदिवसाची पार्टी केली.

सर्वसामान्य लोकांना नियमांच्या चौकटीत बांधणारे प्रशासन अधिकाऱ्यांबाबत एवढे निष्काळजी कसे झाले ? असा संतप्त सवाल नागरिक करू लागले आहे. त्यामुळे आयुक्त गोरे यांनी तातडीने दखल घेत शनिवारी कारवाईची नोटीस बजावली आहे.

आरोग्य अधिकारी बोरगे यांनी यांनी कार्यालयात कनिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांच्यासमवेत मास्क न वापरता, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता, गर्दी जमवून वाढदिवस साजरा केला. त्यामुळे बोरगे यांना कोरोनाबाबतचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

डॉ. बोरगे यांचे हे वर्तन कार्यालयीन शिस्त सोडून अत्यंत गैर, बेजबाबदारपणे, कामकाजामध्ये अक्षम्य असे दुर्लक्ष करणारे व महापालिकेची जनमानसात प्रतिमा मलिन करणारी आहे. त्यामुळे डॉ. बोरगे यांना वैयक्तिक जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध कारवाई का करू नये,

याबाबतचा खुलासा २४ तासांत द्यावा, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्याचे बजावण्यात आले आहे. वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी होणारे अधिकारी, कर्मचारी यांनाही ही नोटीस बजावण्यात आली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24