Health Tips : आजार टाळण्यासाठी पावसात भिजू नका

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- पावसाळा सुरू होताच मोसमी आजारही दार ठोठावू लागतात. पावसात भिजल्यामुळे सर्दी, खोकला व किंचित तापाच्या केसेस येत आहे. लेच मलेरिया, कावीळ व गॅस्ट्रो एंट्राइटिसनेही लोक ग्रस्त होत आहेत.

व्हायरल आणि टायफाइडमध्ये लक्षणे एकसारखी असतात. टायफाइड वाढल्यास उलट्या होण्यास सुरुवात होते. तेच काविळीच्या केसेसमध्ये फीव्हह येतो ब भूक बंद होते. यासाठी ताप आल्यानंतर उपचारात बेपर्वाई करू नये.

लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तशा आता कोव्हिड च्या केसेस कमी आहेत. पण कोव्हिड व नॉन कोव्हिडचे डायप्रोस करून उपचार सुरू करायला हवेत. पावसाळ्यात भिजल्यास वा इतर कारणाने पडसे सुरू होते.

ते दोन ते दिवसात बरे होत नसेल व ताप येत असेल तर कोव्हिडची तपासणी करवून घ्यावी. सर्दी व ताप येत असेल तर ते मलेरियाचे लक्षण आहे. दुसरीकडे थंडी न वाजता गार जाणवत ताप येत असेल, हात-पाय दुखत असतील

तर हा कोव्हिड असू शकतो. प्राथमिक स्टेजमध्ये उपचार सुरू केल्यास माइल्ड मॉडरेट कोव्हिड मध्ये बदलण्यापासून रोखता येऊ शकते.

सर्दी-खोकला झालेल्या व्यक्तीपासून दूर राहावे. बचावासाठी एसीत राहू नये. तसेच थंड पेये ही पिऊ नयेत. एसीत राहिल्यामुळे घसा दुखणे ब ताप येऊ शकतो.

अहमदनगर लाईव्ह 24