Health Tips Marathi : चाळिशीनंतर आपले डाएट कसे असावे?

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- उतारवय शरीरात अनेक बदल घडवते. स्नायूंचा अशक्‍तपणा, त्वचेत पिवळसरपणा, पचनात त्रास, भूक मंदावणे अशी अनेक लक्षणे शरीरात दिसतात.

वयस्कर व्यक्‍तींना जेवणात कमी कॅलरीजची गरज असते, तर पौष्टिक घटक जास्त हवे असतात. रोज जास्तीत जास्त ४ चमचे साखर, ३ कप चहा-कॉफी घेऊ शकता, पण किमान ३0 मिनिटे चालायला हवे.

चाळिशीनंतर जास्त चरबीचे पदार्थ, अँडेड शुगर, कॅफीन, फास्ट फूड यांचे प्रमाण मर्यादित करायला हवे. रोजच्या जेवणात दोन फळे व ताज्या भाज्या साम पेल कराव्यात, तसेच ६ ते ८ तास झोप, नियमित वेळी जेवणासोबत रोज किमान तीस मिनिटे चालावे वा व्यायाम करावा.

चाळिशीनंतर जास्त चरबीचे पदार्थ, अँडेड शुगर, कॅफीन, फास्ट फूड यांचे प्रमाण मर्यादित करायला हवे. रोजच्या जेवणात दोन फळे व ताज्या भाज्या साम पेल कराव्यात, तसेच ६ ते ८ तास झोप, नियमित वेळी जेवणासोबत रोज किमान तीस मिनिटे चालावे वा व्यायाम करावा.

साखर :- ० रोजचे प्रमाण : २-४ टीस्पून ० जास्त खाल्ल्यास होणारा धोका : डायबिटीस, लिव्हर प्रॉब्लेम, स्थूलता व हृदयरोग. ० ‘पण आवडत असेल तर: ३0ते ४५ मिनिटे चालावे. जिने चढावेत. रनिंग, रोप जंपिंग, एरोबिक एक्सरसाइज, स्थूलता वाढणे राहते.

मीठ :- ० रोजचे प्रमाण : पाच ग्रॅम ० जास्त खाल्ल्यास : हाय ब्लडप्रेशर, हृदयरोग, डोकेदुखी, पोटाचा कॅन्सर. ० आवडत असेल तर : ३0 मिनिटे सायकलिंग, वेट ट्रेनिंग, १0 मिनिटे ब्रिस्क वॉक, हे उच्चरक्‍तदाबात फायदेशीर असते.

ड्रायफ्रूट :- ० रोजचे प्रमाण : बदाम ८, काजू २, अक्रोड २. ० जास्त खाल्ल्यास : वजन वाढणे, हृदयासंबंधित समस्या, स्ट्रोक. ० आवडत असेल तर : १0 मिनिटे कॉडियोएक्सरसाइज हार्टला फिट ठेवील. ३0 मिनिटे योग, ५ मिनिटे डीप ब्रीदिंग, यामुळे वजन नियंत्रित राहील.

तैल, तुप, लोणी :- ० रोजचे प्रमाण : तेल ३ टीस्पून, तूप १ स्पून . ० जास्त खाल्ल्यास : बॅड कोलेस्ट्रॉल वाढतो. शुगर/ गॅस्ट्रिक प्रॉब्लेम. ० आवडत असेल तर : रोज किमान शश ३ कि.मी. चालावे. रनिंग वा २0 मिनिटे ब्रिस्क वॉक, हे डायबिटीसचा धोका कमी करते.

व्हाईट ब्रेड/मैदा :- ० रोजचे प्रमाण : वीकली वा १५ दिवसांतून एकदा. ० जास्त खाल्ल्यास : एलडीएल वाढतो, स्थूलता, आर्टरीजसंबंधित समस्या. ० आवडत असल्यास : जम्पिंग रोप, २0 मिनिटे सायकलिंग, ब्रिस्क बॉक, सिंगल टेनिस खेळणे, बचावासाठी उपयुक्‍त, यामुळे रक्तवाहिन्यांत प्रवाह उत्तम राहतो.

 फास्ट/प्राडडफूड :- ० रोजचे प्रमाण: पंधरा दिवसांतून एकदा घेऊ शकता. ० जास्त खाल्ल्यास : स्थूलता, नैराश्य, हार्ट डिसीज, स्ट्रोक, कॅन्सर. ० आवडत असल्यास: ९ बर्गर म्हणजे १00 मिनिटे चालणे, फ्रेंच फ्राइजसाठी ९0 मिनिटे, २ स्लाइस पिझ्झा खाल्ल्यास ८३ मिनिटांचा

चहा/ कॉफी :- ० रोजचे प्रमाण : एका दिवसात जास्तीत जास्त तीन कप ० जास्त घेतल्यास : अँसिडिटी, एंग्झायटी, इंसोम्निया, अस्वस्थता व फीट्स. ० आवडत असल्यास : ५ मिनिटे डीप ब्रीदिंग, ३0 मिनिटे मध्यम गतीचा एक्सरसाइज, यामुळे झोपेविषयीच्या तक्रारीकमी होतील

Ahmednagarlive24 Office