हेल्थकार्ड सिस्टीम ही नव्या आरोग्य व्यवस्थेची सुरवात ठरेल – डॉ. राजेंद्र विखे पाटील

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- लोणी दि- १४( प्रतिनिधी ) प्रवरा मेडिकल ट्रस्ट सुमारे १० कोटी रुपये खर्च करून नव्या संगणक प्रणालीच्या साहाय्याने सुरु केलेली

हेल्थकार्ड सिस्टीम ही नव्या आरोग्य व्यवस्थेची सुरवात ठरेल असे मनोगत प्रवरा मेडिकल ट्रस्टचे चेअरमन डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी आज व्यक्त केले.

प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या नवीन डेटा सेंटरचे व नवीन सर्वसामावेशक संगणक प्रणालीचे उदघाट्न आज डॉ राजेंद्र विखे पाटील यांच्या हस्ते झाले.

यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सौ. सुवर्णाताई विखे पाटील, ध्रुव विखे पाटील, प्रवरा आरोग्य विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. एस. एन. जंगले, अधिष्ठाता डॉ. राजवीर भलवार, डॉ. हेमंत कुमार,

कुलसचिव डॉ. संपत वाळुंज, श्री. पंजाबराव आहेर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी या नव्या संगणक प्रणाली मुळे प्रवरा मेडिकल ट्रस्ट आणि प्रवरा आरोग्य विद्यापीठ यांचे काम अधिक पारदर्शक होण्याबरोबर अधिक गतीने होण्यास मदत होणार आहे.

या नवीन प्रणालीच्या आधारे येत्या १५ ऑगस्ट पासून सुरु करण्यात येणारी हेल्थकार्ड ही सिस्टीम प्रवरा परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची आरोग्य पत्रिका असेल.

ही नवीन प्रणाली म्हणजे प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या नव्या मैलाच्या प्रवासाची सुरवात आहे असा मला विश्वास आहे असे मत विखे पाटील यांनी व्यक्त केले कार्क्रमाचे प्रास्ताविक डॉ राजवीर भलवार यांनी केले. तर सूत्रसंचालन संगणक विभाग प्रमुख श्री. महेश तांबे यांनी केले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24