ताज्या बातम्या

सत्तासंघर्षावर २२ ला सुनावणी नक्की, प्रकरण सहाव्या क्रमांकावर, पण…

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra Politics ; राज्यातील सत्तासंर्घावर पुढे ढकलण्यात आलेली सुनावणी आता २२ ऑगस्ट रोजी नक्की होणार असल्याची चिन्हे आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाज पत्रिकेत त्या दिवशी सहाव्या क्रमांकावर हे प्रकरण ठेवण्यात आल्याचे दिसत आहे.

त्यामुळे या दिवशी सुनावणी होणार हे नक्की असेल तरी नेमके काय होणार? प्रकरण चालविले जाणार की मोठ्या खंडपीठाकडे सोपविण्याचा निर्णय होणार? हे त्या दिवशीच स्पष्ट होईल.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्षावर ही सुनावणी होणार आहे. दोन्ही बाजूंकडून वेगवेगळ्या याचिका दाखल आहेत.

तर पुण्यातील वकिलांनी मतदारांतर्फेही याचिका दाखल केली आहे. एकूण ६ याचिका आहेत. या सर्वांवर एकत्रित सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांचा कार्यकाळ २६ ऑगस्ट रोजी संपणार आहे.

त्यामुळे पुढे सुनावणी लांबल्यास खंडपीठ हेच राहणार की बदलणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्व याचिका एकत्र करून घटनापीठाकडे सोपवण्यासाठी कुणीही विरोध केलेला नाही.

त्यामुळे याचिका घटनापीठाकडे दिल्या जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे झाले तरीही हे प्रकरण पुन्हा लांबणीवर पडणार आहे.

Ahmednagarlive24 Office